महाराष्ट्रातील या जिल्ह्यात 50 हजाराहून अधिक कोरोनाची सक्रिय प्रकरणे लॉक डाऊन लागण्याची शक्यता !

शुक्रवार, 26 मार्च 2021 (19:49 IST)
महाराष्ट्राच्या पुणे येथे बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांची कमतरता असल्यामुळे गुरुवारी येथे कोरोना विषाणू बाधितांच्या सक्रिय घटनेत वाढ झाली आहे. इथे संख्या 50 हजाराहून अधिक झाली आहे. राज्य सरकारच्या आकडेवारीवरून असे आढळून आले आहे की गुरुवारी येथे सहा हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे सामोरी आले आहे. आज 6,427 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आले आहेत. या सह पुण्यात सक्रिय प्रकरणाची संख्या सुमारे 50,289 पर्यंत वाढली आहे.
गुरुवारी केवळ 2,808 रुग्ण बरे झाले आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये कोविड 19 बेड पैकी 80 टक्के बेड बुक आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांना येत्या काही दिवसात मागणीसाठी अधिक बेड,आयसीयू,आणि व्हेंटिलेटर पुरवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागणार.
आज उपमुख्यमंत्री यांनी पुण्यात कठोर पाऊले उचलले जाण्याचे संकेत दिले आहे. यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत इशारा दिला. ते म्हणाले, "की लोकांना सांगायचे आहे की जर एका आठवड्यात पुण्यात कोविडच्या स्थितीत काहीही सुधारणा झाली नाही तर कडक पाऊले उचलले जातील. त्यांनी लोकांना कोविड प्रोटोकॉल चे पालन करण्याची सक्त ताकीद दिली .त्यांनी मास्क लावणे आणि दोन हात अंतर राखण्याचे देखील सांगितले आहे .तसेच त्यांनाही वारंवार हात धुण्यावर जोर दिला. 
ते म्हणाले की जास्तीत जास्त 50 लोकांना लग्नाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची मुभा असेल तर 20 लोक अंत्यसंस्कारात सहभागी होतील. सर्व राजकीय आणि सामाजिक कार्यक्रम देखील रद्द केले गेले आहेत. पवार म्हणाले, रात्री 10 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स चालवण्यास परवानगी दिली जाईल. उपमुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही पुण्यात एक मोठे रुग्णालय आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठे सुविधा केंद्र सुरू केले असून ते एप्रिलपासून सुरू होईल.आम्ही शहरात कोविड -19 केंद्रेही सुरू करीत आहोत. '' जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचीही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती