पनवेल महानगरपालिका क्षेत्रात रात्री संचार बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा ,खेळांचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पनवेल महानगरपालिकेने आज रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचार बंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 21 मार्चपर्यंत लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींना यामध्ये सूट असणार आहे.
अनेक ठिकाणी मास्क आणि इतर कोरोनाचे नियम पाळत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. पुणे, मुंबई व्यतिरिक्त आता राज्यातील ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. राज्य सरकार वांरवार याबाबत नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत असताना देखील गर्दी कमी होत नाहीये. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे.