आज महाराष्ट्रात सर्वाधिक 23 हजारहुन अधिक नवीन कोरोनाबाधितांची प्रकरणे नोंदली गेली. बऱ्याच जिल्ह्यात प्रतिबंध आणि रात्रीचा कर्फ्यू जाहीर करून देखील महाराष्ट्रात प्रकरणे थांबत नाही. महाराष्ट्र सध्या कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. गेल्या आठवड्यात केंद्राची टीम कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचली होती. या टीमने दिलेल्या माहितीच्या आधारे सचिवांनी राज्य सरकारला पत्र लिहिले. केंद्राने राज्यात खबरदारीमध्ये दुर्लक्षितपणा आणि कमकुवत यंत्रणा नमूद केली.
याच अनुक्रमात पंजाब,गुजरात, कर्नाटक,आणि राजधानी दिल्ली मध्ये देखील प्रकरणे वाढत आहे.