कोरोनाच्या सर्टिफिकेटवरुन मोदींचा फोटो गायब!

गुरूवार, 2 मे 2024 (15:11 IST)
कोरोना महामारी दरम्यान व्हॅक्सिनेशन केल्यानंतर आरोग्यमंत्रालय कडून प्रत्येक नागरिकाला व्हॅक्सिन सर्टिफिकेट देण्यात आले होते. याच कोरोना व्हॅक्सिन प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र नोंदी यांचे चित्र काढून टाकण्यात आले आहे. कोरोना महामारी दरम्यान व्हॅक्सिनेशन केल्या नंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय व्दारा प्रमाणपत्र दिले गेले होते. 
 
ज्या प्रमाणपत्रावर खाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो होता. तर या प्रमाणपत्रावरून नरेंद्र मोदी यांचा पोहोतो काढून टाकण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक एक्स युजरने आपले कोविड वॅक्सीन प्रमाणपत्रचा फोटो शेयर करतांना अंगितले की, यावरून मोदींचा फोटो दिसत नाही आहे. याला चेक करण्यासाठी लगेच लगेच वॅक्सीन सर्टिफिकेड डाउनलोड केले. त्यांचा फोटो यावरून गायब झाला आहे. आता प्रश्न निर्माण  की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का काढून टाकण्यात आला आहे.
 
द प्रिंट रिपोर्ट अनुसार आरोग्य एवंम कुटूंब कल्याण मंत्रालयच्या अधिकाराने सांगितले की, व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून टाकण्या मागचे कारण हे आहे की, लोकसभा निवडणूकमुळे आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. लोकसभा निवडणूक दोन टप्प्यात मतदान झाले आहे. वर्तमानमध्ये आदर्श आचार संहिता लागू आहे. जी निवडणूक संपल्यानंतर समाप्त होईल. 
 
2022 मध्ये गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब, उत्तरप्रदेश सोबत अनेक राज्यांमध्ये झालेल्या विधासभा निवडणूक दरम्यान पंतप्रधानांचा फोटो प्रमाणपत्रावरून काढून टाकण्यात आला होता. निवडणूक आयोगाकडून हा आदेश आला होता.  

Edited By- Dhanashri Naik  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती