राज्यात कारोना बाधित रुग्णांची संख्या ११३५ तर ११७ रुग्णांना घरी सोडले
गुरूवार, 9 एप्रिल 2020 (09:50 IST)
राज्यात नव्याने कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ हजार ९० नमुन्यांपैकी २५ हजार ७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सध्या राज्यात ३४ हजार ९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव आणि वाशीम मधील आहे.
दरम्यान, राज्यात ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७२ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी ५ मुंबईत तर २ पुणे येथे तर १ कल्याण डोंबीवलीमधील आहे.
1) सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात धारावी येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.
2) संध्याकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला मधुमेह होता.
3) दुपारी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
4) दिनांक ६ एप्रिल रोजी रात्री कस्तुरबा रुग्णालयात कोविड १९ बाधित रुग्णाची सहवासित असणाऱ्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला अस्थमा आणि फुप्फुसाचा जुनाट विकार होता.
5) सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात एका ५९ वर्षीय महिलेचा कोविड१९ मुळे मृत्यू झाला.
6) पहाटे पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये ४४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह होता. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.
7) पुण्याच्या ५५ वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात काल कोविड१९ मृत्यू झाला.
8) कल्याण डोंबिवली येथील ५५ वर्षीय स्त्रीचा बाबू जगजीवनराम रुग्णालय, मुंबई येथे ६ एप्रिल रोजी
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई ७१४ ( मृत्यू ४५)
पुणे १६६ ( मृत्यू १०)
पुणे (ग्रामीण) ०६
पिंपरी चिंचवड मनपा १७
सांगली २६
ठाणे मनपा २४ (मृत्यू ०३)
कल्याण डोंबिवली मनपा २६ (मृत्यू ०२)
नवी मुंबई मनपा २९ (मृत्यू ०२)
मीरा भाईंदर ०३ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा १० (मृत्यू ०२)
पनवेल मनपा ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १),रत्नागिरी, यवतमाळ प्रत्येकी ०३
नागपूर १९ (मृत्यू ०१)
अहमदनगर मनपा १६
अहमदनगर ग्रामीण ०९
उस्मानाबाद ०४
लातूर मनपा ०८
औरंगाबाद मनपा १२ ( मृत्यू ०१)
बुलढाणा ०८ (मृत्यू ०१)
सातारा ०६ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मनपा ०२
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, अमरावती प्रत्येकी १ (मृत्यू २ जळगाव व अमरावती)
एकूण- ११३५ त्यापैकी ११७ जणांना घरी सोडले तर ७२ जणांचा मृत्यू
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या मुंबईत ६४५, बुलढाणा १९८, वसई विरार मध्ये १८३, मीरा भाईंदर मनपामध्ये २०० तर ठाणे मनपा मध्ये ३३१ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३६५८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.