EMI टाळण्यासाठी फोन कॉल किंवा मेसेज आल्यास सावध राहा, ओटीपी शेअर करू नका

मंगळवार, 7 एप्रिल 2020 (17:14 IST)
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लॉकडाऊनची परिस्थितीला बघून रिझर्व्ह बँकेने बँकेच्या कर्जधारकांना मोठा दिलासा देऊन त्यांना तीन महिन्याची ईएमआय पुढे ढकलण्याचा पर्याय दिला आहे. या दरम्यान काही सायबर ठग याचा फायदा घेऊन ग्राहकांना बँकेचे प्रतिनिधी म्हणून कॉल करीत आहे. त्यांना कर्जाची ईएमआय पुढे ढकलण्यासाठी ओटीपी मागत आहे. काही भोळेभाबडया लोकांकडून चुकून ओटीपी सांगितल्यावर त्यांचा खात्यातून सर्व पैसे काढले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना या बाबत एक खबरदारी दिली आहे. 
 
एसबीआयने ट्विट करून म्हटले आहे, की सायबर फसवणूक करणारे लोकांना फसविण्याचे नवे नवे मार्ग शोधतात. फसवे ग्राहकांना कॉल करतात आणि त्यांचा कडून कर्जाची ईएमआय थांबविण्यासाठी ओटीपी सामायिक करण्याचे सांगत आहे. आपण तसे करू नका. आपले ओटीपी कोणाशीही सामायिक करू नका. असे केल्यास आपल्या खात्यामधून त्वरित पैसे काढून घेण्यात येतात. आपला ओटीपी कोणाशीही सामायिक करू नका. ईएमआयच्या योजनेबद्दलची योग्य माहिती मिळविण्यासाठी बँकांच्या साईट वर जाऊन तपशील करावा. 
 

Cyber fraudsters keep finding new ways to scam people. The only way to beat the #cybercriminals is to #BeAlert & be aware. Please note that EMI Deferment does not require OTP sharing. Do not share your OTP. For details on EMI Deferment scheme, visit: https://t.co/wP3Xux99vI#SBI pic.twitter.com/2GZSHX3ONa

— State Bank of India (@TheOfficialSBI) April 5, 2020
EMI कशा प्रकारे थांबता येईल
एसबीआयच्या म्हणण्यानुसार ज्या ग्राहकांना त्यांचा कर्जाची ईएमआय ठेवायची असेल त्यांनी बँकेत या संदर्भात बँकेला ईमेल करून अर्ज करावयाचे असते. ज्यांना ईमेल करणे शक्य नसेल त्यांनी आपले अर्ज लिहून देऊ शकतात आणि बँकेच्या मुख्य शाखेत देऊ शकतात. अर्जाचे स्वरूप आणि एसबीआय ईमेल आयडी बद्दलची सर्व तपशील एसबीआयच्या संकेत स्थळावर https://bank.sbi/stopemi उपलब्ध आहे. त्याच वेळी 3 महिन्यांसाठी ईएमआय ठेवल्यास वास्तविक परतफेड कालावधीत अतिरिक्त तीन महिने त्यात जोडले जातील आणि ईएमआय स्थगितीच्या तीन महिन्यात, व्याज आकारले जाईल जे नंतर अतिरिक्त ईएमआय म्हणून द्यावे लागतील. ज्यांना ईएमआय होल्ड करायचा नसेल त्यांनी हे करण्याची आवश्यकता नाही. त्यांचा ईएमआय जसा होता तसाच कापला जाईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती