हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी 159 कोटीचे अनुदान

बुधवार, 2 जून 2021 (16:39 IST)
हाफकिन बायोफार्माला कोव्हॅक्सिन लस उत्पादनासाठी 159 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढणार आहे. हाफकिन बायोफार्मा पुढील आठ महिन्यात उत्पादन करणार आहे. केंद्र सरकारकडून 65 कोटी तर राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. आता हाफकिन 22.8 कोटी कोव्हॅक्सिनचे उत्पादन करणार आहे.
 
दरम्यान, आता महाराष्ट्र राज्यातील हाफकिन बायो फार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेडला कोरोनावरील कोव्हॅक्सिन लसीचे एका वर्षात  22.8  कोटी डोस तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे उत्पादन मुंबईतील परेल कॉम्प्लेक्समधील कंपनीत करण्यात येणार आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती