पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणूचे BF.7 स्वरूपाचे चार रुग्ण आढळले आहेत. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यांनी सांगितले की, नुकतेच अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये त्यांना नवीन प्रकारच्या कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली. चारही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
चारपैकी तीन नादिया जिल्ह्यातील आहेत, तर एक व्यक्ती बिहारचा आहे, परंतु सध्या कोलकाता येथे राहतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात कोलकाता विमानतळावर एका परदेशी नागरिकासह दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले. त्याला ओमिक्रॉनच्या BF.7 सबवेरियंटने संसर्ग झाल्याची पुष्टी केली.