कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी पॅनल बुधवारी प्रौढांसाठी कोरोनाचा बूस्टर डोस म्हणून कोव्हॉवॅक्स' वर निर्णय घेऊ शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोरोना लस 'कोव्हॉवॅक्स' ला बाजारात आणण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय केंद्रीय औषध नियामक प्राधिकरणाचे तज्ञ पॅनेल बुधवारी घेऊ शकते. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कोव्हॉवॅक्स' चा डोस ज्यांना कोव्हीशील्ड किंवा कोवॅक्सिनचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना दिला जाऊ शकतो.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या विषय तज्ञ समितीची बैठक 11 जानेवारी रोजी होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) मधील सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक प्रकाश कुमार सिंग यांनी अलीकडेच भारतातील औषध नियंत्रक जनरल (DCGI) यांना पत्र लिहून प्रौढांसाठी बूस्टर डोस म्हणून कोव्हॉवॅक्स' ला मान्यता देण्याची विनंती केली. एका अधिकृत सूत्राने सांगितले की, काही देशांमध्ये साथीच्या वाढत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर लवकर निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.