मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या पुढेच येत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात बुधवारी 85 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मुंबईत अडीच हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता वाढली आहे.
राज्यात आजपर्यंत 6 कोटी 7 लाख 68 हजार 760 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 65 हजार 386 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.69 टक्के आहे. सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.