भारतात गेल्या २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही मागील 5 महिन्यात ही एका दिवसातील उच्चांक आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
काळजीची बाब म्हणजे सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोलाचा समावेश आहे. देशभरात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.