सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक

गुरूवार, 9 एप्रिल 2020 (07:24 IST)
कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. जर घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही, तर नियमभंग करणाऱ्यांना थेट बेड्या ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने मास्कची सक्ती करतानाच मास्कसाठी अनेक पर्यायही दिले आहेत. यात घरगुती स्वरुपाचा चांगला मास्कलाही परवानगी देण्यात आली आहे. वैयक्तिक किंवा  कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी येताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला थेट अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
आदेशानुसार कोठे कोठे मास्क वापरणं बंधनकारक
 
रस्ते, रुग्णालयं, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी 3 थराचा (3 ply) किंवा चांगल्या पद्धतीने घरी बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक आहे.
वाहन चालवताना ड्राइव्हर आणि गाडीत बसलेल्या सर्वांनी मास्क घालणे आवश्यक आहे.
मास्क घातल्याशिवाय कुणीही बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बसू नये, उपस्थित राहू नये.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी कारवाई करतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती