ब्रिटनचे पंतप्रधान रिकव्हर होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला

सोमवार, 13 एप्रिल 2020 (08:27 IST)
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता त्याच्यावर यशस्वी उपचार केल्यानंतर ते रिकव्हर झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. प्रवक्ताच्या माहितीनुसार, एका आठवड्यानंतर बोरिस जॉनसन यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यादरम्यान त्यांना तीन दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
 
बोरिस जॉनसन यांनी आपला जीव वाचवल्यामुळे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले आहेत. जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर शनिवारी लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयातील अति दक्षता विभागामध्ये (आयसीयू) विभागातून बाहेर आणले होते. यानंतर ५५ वर्षीय जॉन्सन यांनी आपल्या निवेदनात सगळ्याचे आभार मानले आहेत.
 
ब्रिटिश गृहमंत्री प्रिती पटेल यांनी याबाबत शनिवारी सांगितलं की, पंतप्रधानांना अजून पूर्णतः बरे होण्यासाठी थोडा वेळ आवश्यक आहे. त्यामुळे ते पुन्हा कामावर लगेच रुजू होणार नाही आहेत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये ८४ हजार २७९ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० हजार ६१२ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसंच १ हजार ९१८ कोरोना रुग्ण हे रिकव्हर झाले आहेत.
 
वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती