महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 6005 नवीन प्रकरणे, आणखी 177 रुग्णांचा मृत्यू

बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (07:57 IST)
मंगळवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या 6005 नवीन रुग्णांची पुष्टी झाली, त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या वाढून 63,21,068 झाली, तर 177 अधिक संक्रमित लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 133215 वर पोहोचला. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की आज 6799 रुग्ण देखील संसर्गातून बरे झाले आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात 61,10,124 रुग्ण संसर्गापासून मुक्त झाले आहेत, त्यानंतर संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 74318 वर आली आहे. 
 
विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, मुंबईत 291 नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि तीन संक्रमित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. विभागाच्या मते, राज्याच्या राजधानीत एकूण प्रकरणे 735657 वर गेली आहेत आणि मृतांचा आकडा 15911 वर पोहोचला आहे. मुंबई विभागात, 844 नवीन प्रकरणे आढळली आणि 21 संक्रमित मृत्यूमुखी पडले, त्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या 16,43,067 वर गेली आहे आणि मृतांचा आकडा 34,401 वर गेला आहे. नाशिक विभागात 841 नवीन प्रकरणे समोर आली आहेत,तर 717 अहमदनगर जिल्ह्यात सापडली आहेत. 
 
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण आढळले?
पुणे विभागात 2245 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी पुण्यात 690, सातारामध्ये 595 आणि सोलापूर जिल्ह्यात 544 रुग्ण आढळले आहेत. कोल्हापूर विभागात 1747 नवीन संक्रमित आढळले आहेत, तर  777 सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सापडले आहेत.औरंगाबाद विभागात 62, लातूर विभागात 214,अकोला विभागात 32 आणि नागपूर विभागात 20 नवीन प्रकरणे आढळली आहेत. जळगाव आणि परभणी शहरे तसेच नंदुरबार,हिंगोली,यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मंगळवारी कोविड 19 चे एकही प्रकरण आढळले नाही, असे विभागाने सांगितले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती