राज्यात 4,154 नवे रुग्ण, 4,524 जणांना डिस्चार्ज

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:45 IST)
राज्यात शुक्रवारी 4 हजार 154 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे 4 हजार 524 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 64 लाख 91 हजार 179 एवढी झाली असून, त्यापैकी 62 लाख 99 हजार 760 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.05 टक्के इतकं आहे. राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्ण सक्रिय आहेत.

राज्यात आज 44 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 57 लाख 020 हजार 628 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 96 हजार 579 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 952 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
.
राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही.शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे.अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती