आतापर्यंत १ लाख अधिक रुग्ण होऊन घरी

शनिवार, 4 जुलै 2020 (08:54 IST)
राज्यात कोरोनाच्या ६३६४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ९११ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. ३५१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या १ लाख ४ हजार ६८७ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२४ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १० लाख ४९ हजार २७७ नमुन्यांपैकी १ लाख ९२ हजार ९९० नमुने पॉझिटिव्ह (१८.३९ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार  ४४८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी १५० मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ४८ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.३४ टक्के एवढा आहे.
 
मागील ४८ तासात झालेले १५० मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-२, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा-५, उल्हासनगर मनपा-१, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-१, वसई-विरार मनपा-५, मालेगाव मनपा-१, धुळे मनपा-२, जळगाव-३, जळगाव मनपा-२, नंदूरबार-१, पुणे-२, पुणे मनपा-१६,सोलापूर मनपा-५, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-४, जालना-५, लातूर-१, अकोला-२, अकोला मनपा-१, अणरावती-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती