राज्यात मंगळवारी कोरोनाच्या ४८७८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७५ हजार ९७९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. १९५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९० हजार ९११ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मागील ४८ तासात झालेले ९५ मृत्यू हे मुंबई मनपा-३६, ठाणे-३, ठाणे मनपा-९, कल्याण-डोंबिवली मनपा- ४, भिवंडी निजामपूर मनपा-३, वसई-विरार मनपा-२, नाशिक-२, नाशिक मनपा-१, जळगाव-५, पुणे-१, पुणे मनपा-५, पिंपरी चिंचवड मनपा-३, सोलापूर मनपा-२, कोल्हापूर-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-२, औरंगाबाद मनपा-११, लातूर-१,अकोला-२, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.