भारताच्या चार सुवर्णकन्या!

वेबदुनिया

बुधवार, 13 ऑक्टोबर 2010 (08:56 IST)
पी टी उषा यांच्यानंतर भारतीय एथेलेटिक्स प्रकारात एकाही खेळाडूने चमकदार कामगिरी केली नव्हती. हा खेळ उपेक्षित मानला जात. आता कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला चार सुवर्णकन्या मिळाल्या आहेत. या सुवर्णकन्यांनी नवीन इतिहास रचत भारताला या प्रकारात प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

मंगळवारी गेम्समध्ये 1600 मीटर धावण्‍याच्या शर्यतीत भारताच्या सिनी जोंस, चिदानंदा, अश्विनी व मनदीप कौर यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले.

त्यांच्या विजयानंतर मैदानावरील प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष करत त्यांचे अभिनंद केले. त्यांच्या या विजयाने आता भारताच्या खात्यात 32 सुवर्ण पदकं झाली आहे. भारताने मँचेस्टरमध्ये झालेल्या गेम्सचा विक्रमही मोडीत काढला आहे.

वेबदुनिया वर वाचा