कॉमनवेल्थ गेम्समध्ये नेमबाजीत भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. हिना सिद्धूने 10 मीटर एअर पिस्तोल या गटात भारताला रोप्य पदक मिळवून दिले आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय नेमबाजांनी चमकदार कामगिरी केली असून,आतापर्यंत या खेळात भारताला सर्वाधीक सुवर्णपदकं मिळाली आहेत. यात गगन नारंगच्या चार सुवर्ण पदकांचा समावेश आहे.
हिनाने मंगळवारी झालेल्या 10 मीटर एअर पिस्तोल दुहेरी गटात अनुराज सिंहसोबत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.