कॉनवेल्थ गेम्समध्ये डोपिंगप्रकरणी एका भारतीय खेळाडूचेही नाव आले असून, या खेळाडूच्या नावाची घोषणा आज संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी भारतीय खेळाडू व त्याच्या प्रशिक्षकांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
गेम्सचे आंतरराष्ट्रीय प्रमुख माइक फेनेल यांनीच हा खुलासा केला असून, यापूर्वी डोपिंग प्रकरणात दोन नायजेरीयन खेळाडू दोषी आढळून आले आहेत. या दोघांचेही पदक काढून घेण्यात आले असून, भारतीय खेळाडू नेमका कोण याची चर्चा सुरु आहे.