आज 16 सुवर्ण पदकांसाठी झुंज

वेबदुनिया

गुरूवार, 14 ऑक्टोबर 2010 (11:24 IST)
कॉमनवेल्थ गेम्सचा आजचा अखेरचा दिवस. आज 16 सुवर्ण पदकांसाठी अनेक खेळाडू झुंज देणार आहेत. यात भारताच्या साईना नेहवाल व हॉकी संघाचाही समावेश आहे.

महिला एकेरी गटात साईना नेहवालचा आज अंतिम सामना आहे, तर दुसरीकडे भारतीय हॉकी संघ कांगारुंशी भिडणार आहे. एकीकड साईनाचे पारडे जड मानले जात असले तरी दुसरीकडे भारताला मात्र बलाढ्य कांगारूंना चांगलीच टक्कर द्यावी लागणार आहे.

महिला दुहेरी गटात ज्वाला गुट्टा व अश्विनी माचिमंदा ही भारतीय जोडी अंतिम सामन्यात आली असून, त्यांचाही आज सामना होत आहे.

आज जिमनॅस्टीकमध्ये चार, टेबल टेनिसमध्ये तीन, मॅराथॉनमध्ये दोन व नेट बॉलमध्ये एका सुवर्णपदकासाठी सामने होत आहेत.

वेबदुनिया वर वाचा