विजेंद्रचा धक्कादायक पराभव

वेबदुनिया

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2010 (10:57 IST)
कॉमनवेल्थ गेम्समध्ये ज्या खेळाडूंकडून सुवर्ण पदकाची सर्वाधीक आशा होती, त्या विजेंद्रचा पराभव झाल्याने भारतीय चाहते निराश झाले आहेत. आपल्या पराभवाला रेफरी कारणीभूत असल्याचे विजेंद्रने म्हटले आहे.

विजेंद्रला इंग्लंडच्या एंथोनी ओगोगोने पराभूत केले. सामन्याच्या अखेरीत विजेंद्रला कोणतीही माहिती न देताच रेफरींनी एंथोनीला विजयी घोषीत केल्याने प्रेक्षकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे सुरंजय, मनोज व परमजीत यांना रोप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा