16 मार्च नॅशनल वॅक्सीनेशन डे

शनिवार, 16 मार्च 2019 (00:57 IST)
लस लावल्यानंतर शिशूच्या वेदनांना या तीन प्रकारे कमी करा 
1. स्तनपान करावे 
लसीकरण केल्यानंतर लगेच स्तनपान करवल्याने त्याला शांत करण्यास मदत मिळते. स्तनपानामुळे मिळणारी शारीरिक जाणीव शिशूला आराम देते. व त्याच्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. 
 
2. बाळाचे लक्ष दुसरीकडे लावायला पाहिजे 
बाळाला त्याचे आवडते खेळणी देऊन त्याच्या वेदना कमी करू शकतो. घरातील जवळ राहणार्‍या इतर मुलांसोबत त्याला थोडा वेळ घालवू द्या. 
 
3. बर्फ लावावा 
बरेच डॉक्टर इंजेक्शन लावल्यानंतर त्या जागेवर बर्फ लावण्याचा सल्ला देतात. यामुळे बाळाला होणार्‍या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. पण इंजेक्शनच्या जागेवर मालीश करू नये. यामुळे शिशूचा त्रास वाढू शकतो. 1 किंवा दोन दिवसांमध्ये इंजेक्शनच्या वेदना आपोआप कमी होऊ लागतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती