म्हणून चिमुकल्यांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका!

गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (15:45 IST)
लहान मुलं अनेकदा हट्ट करतात किंवा मोठय़ानं रडतात अशावेळी त्यांचे पालक आपल्याकडील स्मार्टफोन काढून त्यांच्या हातात देतात आणि त्यांना गप्प करतात. आजकाल हे दृश्य आपल्याला अनेकदा दिसून येतं. पण असं करणं योग्य नाही. एका संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.
 
अमेरिकेच्या बाल रोग अकादमीनं याबाबत दिशा निर्देश जारी केले आहेत. यानुसार, डिजिटल मीडियाचा जास्त वापर यामुळे मुलांची झोप, त्यांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ् बिघडविण्यास कारणीभूत ठरु शकतो.
 
संशोधकांचं म्हणणं आहे की, पालकांनी आपल्या चिमुकल्यांना स्मार्टफोन अथवा डिजिटल उपकरणं देणं टाळावं. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे केसी. एस. मोट बालरोग रुग्णालयाचे प्रमुख लेखक जेनी रडेस्की यांचं म्हणणं आहे की, अशाप्रकारचे उपकरणं वापरल्यानं मुलांच्या सहनशीलतेच भावना कमी होऊ शकतात.
 
रडेस्की यांच्या मते, ‘डिजिटल मीडिया हा अनेक चिमुकल्यांचा शाळेपासूनच अनिवार्य भाग बनला आहे. 
 
पण त्यामुळे त्याच्या बुद्धीविकासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. लहानपणी मुलांच्या बुद्धीचा विकास हा वेगाने होतो. त्यामुळे या वयात त्यांना अशा उपकरणांपासून थोडं लांब ठेवणं हेच योग्य आहे.’

वेबदुनिया वर वाचा