"समुद्र शिवाजी" सरखेल कान्होजी आंग्रे

छत्रपती शिवाजी महाराजांना "भारतीय नौदलाचे जनक" [Father of Indian Navy] म्हणतात यात काही शंका नाही कारण त्यांनी त्यांच्या शासनकाळात एक सशक्त नौदलाची स्थापना केली होती. तसेच सुमारे 25 वर्षे कोकणचा सागरी किनारा स्वराज्यात सुरक्षित ठेवण्यात यशस्वी ठरले ते म्हणजे 'सरखेल कान्होजी आंग्रे'. त्यामुळे त्यांना 'समुद्रातला शिवाजी' पण म्हणायचे. 
 
कान्होजी आंग्रे हे 18 व्या शतकातील मराठा साम्राज्याच्या नौदलाचे पहिले सेनापती होते. त्यांना सरखेल आंग्रे या नावानेही ओळखले जाते. "सरखेल" चा अर्थ नौदल प्रमुख (अॅडमिरल) असाही होतो. 
 
कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म महाराष्ट्रातील क्षत्रिय कोळी कुटुंबात रत्नागिरी जिल्ह्यात सुवर्णदुर्ग येथे झाला. यांच्या आईचे नाव अंबाबाई असे होते आणि बाबा तुकोजी होते. त्यांनी एकट्याने शिवाजीच्या अधिपत्याखाली सुवर्णदुर्गमध्ये 200 पदे सांभाळली.
 
छत्रपती शिवाजी यांच्या मृत्यूच्या 18 वर्षांनंतर, 1698 साली ताराबाईंच्या शासनात, कान्होजी आंग्रे यांना 'सुरखी' किंवा 'दरिया सारंग' ही उपाधी दिली गेली म्हणजे ते आरमार प्रमुख बनवले गेले. फक्त 10 जहाजांसोबत, कोलाबा येथे आपला केंद्र स्थापित करून त्यांनी आपले शासन करण्यापर्यंत 100 जहाज उभे करून दिले होते.
 
कान्होजींच्या समोर व्यापारासाठी आलेल्या इंग्रेज आणि डच, गोवामध्ये आदिपथ्य जमावून बसलेले पोर्तुगीज, सिद्धी आणि सावंत, हे सगळे शत्रु म्हणून उभे असताना पण ते त्यांचे शासनकाळात एकही युद्ध हारले नाहीत उलट त्यांच्या सगळ्या शत्रुंना मोठी किंमत मोजावी लागली. पुर्तगाली आणि इंग्रेज यांचे संयुक्त प्रहार पण कान्होजींना हरवू शकले नाही.
 
सरखेल आंग्रे यांनी स्वतःचा एक समुद्री कर 'दस्तक' हे लागू केले आणि त्यांच्या हिशोबानी मुघल, इंग्रेज, पोर्तुगीज किंवा डच कोणीही समुद्रपार केल्यावर हा कर अनिवार्य रुपात भरावा असा जाहीर केलं.
 
एका वेळेची गोष्ट आहे, मुंबईशी फक्त दोन मैल अंतरावर कान्होजींनी इंग्रेचांचा एक जहाज धरून घेतला होता ज्याच्यात कारवार येथील इंग्रेज गव्हर्नवरची बायको होती नंतर त्यांनी मोठी रकम घेऊन जहाजाला आणि जनरलच्या बायकोला सोडलं. कान्होजींच्या भीतीमुळे ईस्ट इंडिया कंपनीला आपल्या जहाजांच्या सुरक्षेसाठी खूप पैसा खर्च करावा लागला.
 
सरखेल आंग्रे यांचे बहादुरीचे असे खूप प्रसंग आहेत. 1700 येता येता कान्होजींना "मोस्ट डेरिंग पायरट्स" आणि "प्रिन्स ऑफ पायरट्स" सारखी उपाधी देण्यात आली. त्यांचे आयुष्य समाप्त होण्याचा आधी ते अरब महासागर, सुरत ते साऊथ कोकणाचे स्वामी होऊन गेले होते. त्यांची बुद्धी आणि शौर्याने कोणीही त्यांना कधी पराजित करू शकले नाही.
 
4 जुलै 1729 मध्ये महाराष्ट्राच्या अलिबाग येथे त्यांनी प्राण त्यागले. 1998 मध्ये 'सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सन्मानात खांदेरी आयलॅंडला ‘कान्होजी आंग्रे आयलॅंड’ 
 
असे नाव देण्यात आले आणि भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडला पण INS आंग्रे असे म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती