टोमॅटो फक्त भाजीत टाकणे किंवा सलाड करीत कामास नाही येत तर, टोमॅटोचा उपयोग चटणी बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. टोमॅटोची ही स्वादिष्ट चटणी जेवढी छान लागते तेवढीच ती बनवायला देखील सोपी आहे. आज आपण टोमॅटोच्या दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत. एक आहे शेंगदाणा टोमॅटो चटणी तर दुसरी आहे टोमॅटो कांद्याची चटणी. तर चला जाणून घ्या टोमॅटोच्या या दोन प्रकारच्या चटण्या कश्या बनवाव्या.
हिरवी मिरची
गरम मसाला
कृती-
शेंगदाणा टोमॅटो चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी टोमॅटो, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची आणि मसाले एकत्र ते बारीक करून घ्यावे. मग का बाऊलमध्ये काढल्यानंतर एक कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून तडका तयार करून घ्यावा व चटणीवर घालावा. तर चला तयार आहे आपली शेंगदाणा टोमॅटो चटणी जी डोसा सोबत देखील सर्व्ह करता येते.
लाल मिरची
चणा डाळ
टोमॅटो कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी लसूण आणि लाल मिरची भाजून घ्यावी. यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घालावा. आता पॅनमध्ये चणा डाळ घालून भाजून घ्यावी. तसेच हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. मग याला वरतून मोहरी आणि जिरे, कढीपत्ताचा तडका द्यावा. तर चला तयार आपली टोमॅटो कांद्याची चटणी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.