कृती :
प्रथम एका कढईत तेल गरम करून घ्या. तेल थोडं थंड झालं की त्यात मोहरीची दाळ, तिखट, हळद, हिंग टाकून ते तेल थंड होऊ द्या. तेल थंड होई पर्यंत एका पसरट भांड्यात मोड आलेले मेथीदाणे टाका त्यात चवी नुसार मीठ टाका, गुळ टाकून आणि छान हलक्या हाताने मिक्स करा. आता या मेथीदाण्याच्या मिश्रणावर ते थंड झालेलं लोणच्याचा मसाला(तेल) टाका आणि वरून लिंबाचा रस टाकून परत छान मिसळा. मेथीदाण्याचे लोणचे तयार.