हिवाळ्यात प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आरोग्यवर्धक लसणाचे लोणचे जेवणात घ्या

सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:46 IST)
हिवाळ्यात लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक पोषक घटकांचा खजिना असलेल लसूण प्रतिकारशक्ती देखील मजबूत करतो. लसणामध्ये प्रथिने, चरबी, कर्बोदके, खनिजे, आयरन असते. याशिवाय जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि सल्फ्यूरिक अॅसिड विशेष प्रमाणात आढळतात. हे लोणचे पोळी, भात, पराठ्यासोबत खाऊ शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.  
 
 
 साहित्य -
एक वाटी लसूण सालीसह 
एक वाटी मोहरीचे तेल ,
एकटीस्पून मेथीदाणे,
एक टीस्पून हिंग   
एक टीस्पून बडीशेप,
एक टीस्पून मोहरी,,
लाल तिखट, चवीनुसार
एक टीस्पून हळद. ,
1/2 कप व्हिनेगर 
मीठ चवीनुसार
 
कृती -
सर्वप्रथम कढईत किंवा पॅनमध्ये  मोहरीचे तेल घेऊन चांगले शिजवून घ्या.
तेल गरम झाल्यावर गॅस बंद करून सामान्य तापमानाला येऊ द्या.
पुन्हा गॅस चालू करा आणि गॅस खूप मंद करा, आता लसूण घालून थोडे मऊ होईपर्यंत शिजवा, लक्षात ठेवा की ते जाळू नका.
लसूण मऊ झाला आहे असे वाटल्यावर त्यात हिंग, बडीशेप, मेथीदाणे, मोहरी,  टाकून थोडावेळ हलके परतून घ्या.
आता त्यात हळद, तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
गॅस बंद करा आणि थोड थंड होऊ द्या, काही सेकंदांनंतर त्यात व्हिनेगर घाला आणि मिक्स करा. लसणाचे लोणचे खाण्यासाठी तयार.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती