रात्रीच्या वेळी अभ्यासासाठी जागरण करत असल्यास खास टिप्स

मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020 (09:21 IST)
अशे बरेच विध्यार्थी असतात ज्यांना रात्रीच्या वेळीच अभ्यास करायला आवडतं किंवा परीक्षेच्या वेळी त्यांना रात्र-रात्र जागून अभ्यास करण्याची गरज असते. तसेच रात्रीच्या वेळी अभ्यास करण्याचे विशेष फायदे आहेत. पण बऱ्याच वेळा असं होतं की अभ्यास तर करायचा असतो पण निद्रादेवी त्यांना आपल्या कुशीत घ्यायला बघत असते. अश्या वेळी काय करावं. जर का आपण देखील रात्र रात्र जागून अभ्यास करत आहात किंवा करायचे असल्यास आम्ही आज आपल्या साठी काही टिप्स घेउन आलो आहोत. ज्यामुळे आपल्याला रात्री झोप येणार नाही.
 
1 रात्री उशिरापर्यन्त जागण्यासाठी सर्वात सोपे पर्याय आहे की दुपारी शक्य असल्यास, थोड्या वेळ झोप काढू शकता. जेणे करून आपल्याला रात्री झोप येणार नाही.
 
2 चहा किंवा कॉफी घ्या. जेणे करून रात्रीच्या वेळी हे जागण्यासाठी मदत करेल.
 
3 जर का आपण रात्री अभ्यास फक्त लहान दिवे लावूनच अभ्यास करत आहात आणि बाकीच्या खोलीत अंधार असल्यास, तरी देखील आपल्याला झोप येऊ शकते. शक्य असल्यास खोली मधले दिवे लावूनच अभ्यास करावा. ज्यामुळे आपल्याला पुरेसा उजेड मिळेल आणि आपल्याला येणारे आळस देखील दूर होईल. त्यामुळे आपला अभ्यास देखील व्यवस्थित होईल.
 
4 पलंगावर झोपून अभ्यास करू नका. असं केल्यानं आपणांस झोप येऊ शकते. हे झोपेला आमंत्रण देतं. म्हणून शक्य असल्यास खुर्ची-टेबलावर व्यवस्थित पाठ ताठ करून बसा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती