दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा लेखन सराव व्हावा. तसेच त्यांना परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा अंदाज यावा, यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नावली उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून (SCERT) ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. 'एससीईआरटी'च्या वेबसाइटवर ती मोफत उपलब्ध केली जाणार आहे.
http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर विषयाप्रमाणे प्रश्नावली अपलोड करण्यात आली आहे. तर परीक्षेला सामोरे जाताना येणाऱ्या ताण तणावासाठी मार्गदर्शन आणि समुदेशन करण्यासाठी @scertmaha तर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक आणि समुपदेशकांची सल्ला, मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.