वेब पत्रकारितेत करिअर बनवा

बुधवार, 23 जून 2021 (18:30 IST)
भारतातील वाढत्या संचाराच्या साधनांमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात करिअरच्या संधीही उजळल्या आहेत.दिवसेंदिवस वृत्तवाहिन्या,वर्तमानपत्रांची संख्या वाढत आहे.


पूर्वी पत्रकारिता वर्तमान पत्र,आणि पुस्तकांमध्ये असायची,परंतु इंटरनेटच्या वाढत्या प्रचलनामुळे वेब पत्रकारितेचा जन्म झाला.इंटरनेट वाढत्या समाचार पोर्टलँमधून पत्रकारितेसाठी योग्य पत्रकारांची मागणी केली जाते.
 
 
वेब पत्रकारिता म्हणजे काय-ज्या प्रकारे,वर्तमान पत्र,मासिकात बातम्यांची निवड करायला संपादन किंवा लेखक असतात.हेच कार्य इंटरनेटवर केले जाते.प्रत्येकाला वेगाने बातमी लागते.आजच्या तरुणांची पसंती देखील इंटरनेट बनत आहे.
 
 
पूर्वी जेथे इंटरनेट फक्त कॉम्प्युटर पुरतीच मर्यादित होत.तेथे नवीन तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा कल वाढत आहे.इंटरनेट कुठेही,कधीही वापरू शकतो.हे वेब पत्रकारितेचाच कमाल आहे.की आपण जगाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात बसून कोणत्याही भाषेचे कोणत्याही देशाचे वर्तमानपत्र वाचू शकता.इथे कामात दक्षता असावी.बातमी लिहून त्याला संपादित करणेच नाही तर सतत त्या बातमीला अपडेट देखील करावे लागते.
 
 
वेब पत्रकारितेत बऱ्याच संभाव्य आहे.या क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी बातम्या समजून,त्यांना सादर करण्याची कला,तांत्रिक ज्ञान,भाषेची चांगली जाण असणे, आवश्यक आहे.न्यूज पोर्टल स्वरूपात स्वतंत्ररित्या कार्य करणाऱ्या साईट्सची संख्या भारतात कमीच आहे.
 
 
अशा साईट्सची संख्या जास्त आहे ज्या आपल्या वेबसाठी साहित्य आपल्या चॅनल किंवा वर्तमानपत्रातून घेतात.आपण स्वतंत्र न्यूज पोर्टल मध्ये वेब पत्रकार म्हणून करिअर करू शकता. खेळ,साहित्य,कला या सारख्या साईट्सवर करिअरच्या उज्ज्वळ संभावना आहे.मास कम्युनिकेशन किंवा जर्नलिझम मध्ये डिप्लोमा किंवा पदवी घेऊन आपण या क्षेत्रात करिअर करू शकता. 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती