फॅशन डिझायनिंग हा एक व्यावहारिक कलेचा एक प्रकार आहे जो आपल्या कपड्यांना, वस्तू आणि जीवनशैलीला सौंदर्य देतो.फॅशन डिझायनिंगमध्ये कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंत आणि पर्सपासून शूजपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
एक प्रशिक्षित फॅशन डिझायनर या उद्योगाच्या विविध क्षेत्रात डिझाइन वियर उत्पादन, फॅशन मार्केटिंग, क्वालिटी कंट्रोल इत्यादींमध्ये कार्य करू शकतो.याशिवाय कॉस्ट्यूम डिझायनर,पर्सनल स्टायलिस्ट,फॅशन को-ऑर्डिनेटर, फॅब्रिक बायर या क्षेत्रातही काम करता येत.
हा कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो.जसे की फॅशन शो ऑर्गनायझर,गारमेंट स्टोअर चेन,बुटीक, ज्वेलरी हाऊस इत्यादी.