रात्री अभ्यास करताना या टिप्स अवलंबवा

रविवार, 27 जून 2021 (16:47 IST)
असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना रात्री अभ्यास करायला जास्त आवडते. परीक्षेच्या वेळी रात्रभर जागून अभ्यास करायची आवश्यकता पडते.रात्री अभ्यास केल्याचे फायदे देखील आहेत.आपण रात्री जागून अभ्यास करू इच्छित आहात तर या काही टिप्स अवलंबवा .
 
1 रात्री उशिरा पर्यंत जागण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे की दुपारी शक्य असल्यास काही वेळ झोपून घ्या.जेणे करुन रात्री अभ्यास करताना झोप येणार नाही.
 
2 रात्री अभ्यास करताना चहा किंवा कॉफी घ्या.या मुळे आपल्याला झोप येणार नाही.
 
3 रात्री अभ्यास करताना दिवा मंद असल्यास तरीही झोप येते.शक्य असल्यास खोलीत उजेड चांगला असावा.या मुळे आपल्याला झोप येणार नाही.
 
4 रात्री अभ्यास करताना झोपून अभ्यास करू नका.असं केल्याने आपण झोपेला निमंत्रण देता. म्हणून शक्य असल्यास खुर्ची -टेबल वर व्यवस्थित पाठीला ताठ करून बसूनच अभ्यास करावा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती