Career Tips :आयकर अधिकारी कसे व्हावे: एसएससी सीजीएल परीक्षा, पात्रता, पगार, तयारी जाणून घ्या

शनिवार, 28 मे 2022 (14:35 IST)
एखाद्या मोठ्या माणसावर आयकराचा छापा पडताना आपण सर्वांनीच चित्रपटांमध्ये अनेकदा पाहिलं असेल. ज्यामध्ये त्यांच्या घरातील पैसे आणि इतर मालमत्ता तपासले जातात. हा छापा फक्त आयकर विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच टाकला जातो, ज्यामध्ये त्यांचे उत्पन्न, कर आणि मालमत्ता तपासली जातात .
 
भारतातील चांगल्या नोकऱ्यांमध्ये आयकर अधिकाऱ्याचे नाव खूप लवकर येते. या नोकरीत चांगल्या पगारासोबतच सन्मान आणि शक्तीही मिळते. 
 
एक आयकर अधिकारी आयकर विभागात (केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ) काम करतो आणि उत्पन्न आणि कराशी संबंधित काम पाहतो. आयकर अधिकारी, व्यवसाय आणि वैयक्तिक खात्यांचे परीक्षण आणि विश्लेषण करण्याचे काम करण्याबरोबरच, त्यांचा कर योग्य प्रकारे भरला जात असल्याची खात्री करतो.
 
दरवर्षी हजारो मुलं-मुली इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना यश येत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या नोकरीशी संबंधित संपूर्ण माहितीचा अभाव असणे. चला या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या.
 
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) नंतर , ज्या नोकरीसाठी भारतात सर्वात जास्त क्रेझ आहे त्याचे नाव म्हणजे आयकर अधिकारी. एक आयकर अधिकारी आयकर विभागात काम करतो ज्याची CBDT द्वारे नियुक्ती केली जाते. CBDT चे पूर्ण नाव सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आहे.
 
आयकर अधिकारी होण्यासाठी, तुम्हाला एसएससी सीजीएल किंवा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. 
 
कोणतीही प्रवेश परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर काही निकष निश्चित केले जातात.
 
शैक्षणिक पात्रता -
आयकर अधिकारी होण्यासाठी, SSC द्वारे आयोजित CGLपरीक्षेत बसावे लागेल. ज्यासाठी ग्रॅज्युएशन पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्या विषयातून ग्रॅज्युएशन केले आहे हे महत्त्वाचे नाही. SSC CGL परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था/विद्यापीठातून BA, BCOM किंवा BSC पूर्ण केलेले असावे . CGL परीक्षा उत्तीर्ण करून, तुम्हाला प्रथम आयकर निरीक्षक पद मिळते. परीक्षेनंतर, तुम्हाला मुलाखत द्यावी लागेल, त्यानंतर तुमची शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. त्या नंतर आयकर अधिकारी होऊ शकता.या साठी हे टप्पे ओलांडावे लागणार.
 
1 प्राथमिक परीक्षा ( SSC CGL टियर 1 ): जेव्हा एखादा उमेदवार SSC CGL परीक्षेसाठी अर्ज करतो, तेव्हा त्याला/तिला प्रथम प्राथमिक परीक्षेला बसावे लागते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच  पुढच्या टप्प्यावर पोहोचता जी मुख्य परीक्षा आहे.
 
2 मुख्य परीक्षा ( CGL टियर 2 ) : जेव्हा तुम्ही CGL पूर्व परीक्षा पास करता, त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा खूप कठीण आहे, ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तुम्ही निवडीच्या पुढील टप्प्यावर पोहोचता.
 
3 मुलाखत / व्यक्तिमत्व चाचणी : CGL मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीचा अंतिम टप्पा येतो, ज्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसह तुमची मानसिक क्षमता तपासली जाते. मुलाखतीत तुम्हाला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या शेवटच्या पायरीनंतर तुम्हाला मिळणाऱ्या एकूण गुणांवरून तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर होणार की नाही हे ठरवले जाईल.
 
वयो मर्यादा-
वय 17 ते 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तथापि , SC, ST, OBC आणि PWD या राखीव प्रवर्गासाठी 3 ते 13 वर्षे वयाची सूट दिली आहे.
 
एसएससी व्यतिरिक्त, यूपीएससी परीक्षा हा आयकर अधिकारी बनण्याचा आणखी एक मार्ग आहे . UPSC भारतीय महसूल सेवांमध्ये नियुक्तीसाठी नागरी सेवा परीक्षा आयोजित करते, ही परीक्षा UPSC परीक्षेला बसण्यासाठी कमाल वय 32 वर्षे आहे. उमेदवार ही परीक्षा जास्तीत जास्त 6 वेळा देऊ शकतात. उत्तीर्ण झाल्यावर सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केल्यावर  IRS मध्ये सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाते. यानंतर, कालांतराने, कामगिरीच्या आधारावर बढती दिली जाते.
 
 इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सुरुवातीची नोकरी इन्स्पेक्टरची असते, कारण पगार 45 हजार (मूलभूत वेतन) पासून सुरू होतो जो सुमारे1 लाख 40 हजारांपर्यंत जातो. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती