अंगणवाडीत 'आनंदी आनंद गडे'

वार्ता

शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (15:59 IST)
गेल्या काही वर्षांपासून अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात मान्य केली आहे. या अंतर्गत
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता दरमहा 1500 रुपये मानधन मिळणार आहे.तर त्यांचे सहाय्यक म्हणून काम करणार्‍या कर्मचार्‍यांना 700 रुपये
इतके मानधन सरकारने मंजूर केले आहे.

याआधी अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरमहा 1000 रुपये मानधन देण्यात येत होते, यात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर सहाय्यक कर्मचार्‍यांना मिळणार्‍या 500 रुपयांच्या मानधनातही 200 रुपये वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेचा देशातील 18 लाख अंगणवाडी कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा