बजेटचे उद्योग क्षेत्राकडून स्वागत

भाषा

शुक्रवार, 29 फेब्रुवारी 2008 (14:15 IST)
नवी दिल्ली
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी उद्योग क्षेत्राने समाधान व्यक्त केले आहे. चिदंबरम यांनी अतिशय छान अर्थसंकल्प सादर केल्याचे या उद्योगांनी सांगितले.

अपेक्षेनुसार बजेट चांगले आहे. कोणताही नवा कर लावला नाही, हे चांगलेच झाले. पण कॉर्पोरेट टॅक्समध्ये काहीह बदल न केल्याने आम्ही काहीसे असमाधानी आहोत, असे उद्योगांची सर्वोच्च संघटना सीआयायचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी सांगितले.

उद्योजक संजय जिंदाल यांनी सांगितले, की हे संमिश्र बजेट आहे. अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्सला हातही लावलेला नाही. अर्थमंत्र्यांचा संपूर्ण भर कृषी व शिक्षण क्षेत्रावर राहिला.

वेबदुनिया वर वाचा