Urfi Javed Death Threat आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेदला पुन्हा जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे. एका व्यक्तीने तिला लवकरच तुला गोळ्या घालून मारणार अशी धमकी दिली आहे.
उर्फीने त्या व्यक्तीचे ट्वीट आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. उर्फीला मिळालेल्या धमकीत लिहिले होते की लवकर तुला गोळ्या घातल्या जातील. तथापि उर्फीने धमकीला गंभीर घेतले नसून ट्वीट शेअर करत लिहिले की माझा जीवनातील सामान्य दिवस...
उल्लेखनीय आहे की उर्फी आपल्या ड्रेसिंग सेंसमुळे नेहमीच व्हायरल होत असते. तिने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. तिच्या उटपटांग फॅशनमुळे ती ट्रोल होत असते. परंतू उर्फी ट्रोल्सला उलट उत्तर देत असते. मात्र आता तिला जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.