'या' तीन मालिका कायमच्या बंद

मंगळवार, 21 एप्रिल 2020 (21:59 IST)
कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दूभाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील सर्व टीव्ही मालिका, चित्रपट, वेब सीरिज यासारख्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे चित्रीकरण बंद आहे. त्यामुळे सर्व वाहिन्यांनी आपल्या जुन्या लोकप्रिय मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा धडाका चालवला आहे. अशात  तीन मालिका कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होय, बेहद 2, इशारों इशारों में आणि पटियाला बेब्स या मालिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहे. म्हणजेच लॉकडाऊननंतरही या मालिका टीव्हीवर परतणार नाहीत. 
 
संबंधित वाहिन्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या तिन्ही मालिका फिक्शन शो आहेत. याचे स्वरूप आणि या मालिकांच्या कथेची गती ही काळानुरूप आहे. मार्चपासून शूटींग बंद आहे. आपण सध्या ज्या आणीबाणीच्या स्थितीत आहोत, त्या स्थितीत या मालिकांचा तार्किक शेवट शूट करणे शक्य नाही. या तिन्ही मालिका एका रोचक टप्प्यावर होत्या. पण निर्मात्यांशी चर्चा केल्यानंतर या मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संबंधित वाहिनीने स्पष्ट केले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती