लोकप्रिय आणि बहुचर्चित टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. शोचा होस्ट म्हणून लोक कपिलला खूप पसंत करत आहेत. या शोच्या माध्यमातून कॉमेडियनने टीव्हीपासून मोठ्या पडद्यावर आपल्या कॉमिक टायमिंगने थैमान घातले आहे, पण आता हा शो लवकरच बंद होणार आहे.
शेवटचा भाग 2 जुलै किंवा 9 जुलै रोजी टीव्हीवर प्रसारित केला जाईल. शेवटच्या भागामध्ये, अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या शो द नाईट मॅनेजरच्या सिक्वेलच्या प्रमोशनसाठी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, कपिल शर्माने अलीकडेच त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्याची सह-अभिनेत्री अर्चना पूरण सिंगसोबत एक मोहक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने सांगितले की, हे सीझनचे 'शेवटचे फोटोशूट' आहे. या लोकप्रिय शोची जागा इंडियाज गॉट टॅलेंट घेणार असल्याचीही बातमी आहे.