‘झुंड’ चे पहिले पोस्टर प्रदर्शित

मंगळवार, 21 जानेवारी 2020 (11:28 IST)
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हे पोस्टर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये पाठमोरे उभे असलेले अमिताभ बच्चन दिसत आहेत.  नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा पहिला हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत.
 
‘झुंड’ हा चित्रपट विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. त्यांच्या याच कथेवर हा चित्रपट बेतला असल्याचं म्हटलं जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती