ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी सोनू सूदचा मदतीचा हात !

ओडिशा रेल्वे अपघात घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. अजूनही अनेक जखमी, मृत लोक यात सापडत नसल्याचा बातम्या देखील येत आहेत 200 हून अधिक मृत्यू आणि 900 हून अधिक जखमी झाल्यामुळे देशभरात एक  शोककळा पसरली आहे. अनेकांनी अपघाग्रस्तांना मदतीचा हात अगदी हक्काने पुढे केला असून बॉलीवुड अभिनेता सोनू सूदने यात मागे नाही. सोनू ने पीडित कुटुंबांना मदत करण्यासाठी त्याच्या सोबत त्याची खास टीम या कामाला लागली आहे. अभिनयाच्या पलिकडे जाऊन अनेकदा माणुसकी जपत या अभिनेत्याने अनेक सामाजिक काम केलं आहे आणि आता पुन्हा सोनू  ओडिशा अपघातग्रस्तांच्या कुटुंबियां साठी काम करताना दिसत आहे. त्यांच्या टीमने हाती घेतलेल्या या पुढाकारांचा खुलासा करणारा एक व्हिडिओ सोनू ने शेअर केला आहे.
 
नेहमीच तो त्यांच्या कामात चोख असतो आणि हे सोनू ने पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे. सोनू सूदने ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांना त्यांचे जीवन पुनर्निर्माण करण्यात मदत करण्याचे वचन दिले आहे. अपघाग्रस्तांना त्यांचा व्यवसाय स्थापन करण्यात आणि शिक्षणासाठी मदत देण्याचा अनोखा निर्णय सोनू ने घेतला आहे. सोनूची टीम या कुटुंबांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

पीडित कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदने एका हेल्पलाइन स्थापन केली आहे. जेणेकरून ज्यांना मदतीचा हात हवा असेल अशी लोक या हेल्प लाईनमधून च्या माध्यमातून सोनू पर्यंत पोहचू शकतात. SMS द्वारे 9967567520 या क्रमांकावर पोहोचून तो बाधित झालेल्यांना त्याच्या टीमशी जोडण्यासाठी मदत करणार आहे. एसएमएस मिळाल्यावर, त्यांची टीम त्वरित प्रतिसाद देईल आणि मदतीचा हात देणार आहे. 
 
सोनू सूदचा हा उपक्रम ओडिशा रेल्वे अपघातामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना नक्कीच मदत करणार आहे. अपघाग्रस्तांना त्यांच्या जीवनात मोठ्या हिमतीने उभ करण्यासाठी सोनू चा हा पाठींबा नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती