निदान पँट तरी घालायची ना!’ नेटकऱ्यांकडून कियारा अडवाणी ट्रोल

बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (22:04 IST)
अनेक चित्रपटांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी. ‘कबीर सिंग’, ‘शेरशाह’, ‘गुडन्यूज’, यांसारख्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांना आपल्या सकस अभिनयाची ओळख करून दिली. आणि अल्पावधीतच ती लोकप्रिय झाली. सोशल मीडियावरही ती ऍक्टिव्ह असते. त्यामुळेच चाहते तिचे अपडेट्स घेण्यासाठी तिला फॉलो करत असतात. सध्या कियाराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आणि या व्हिडिओनंतर मात्र ती चांगलीच ट्रोल होते आहे.
 
‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची सक्सेस पार्टी नुकतीच करण जोहर याच्या घरी झाली. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी कियारा देखील उपस्थित होती. मात्र, या कार्यक्रमातील तिचा पेहराव हा चर्चेचा आणि तेवढाच टीकेचा विषय ठरला. यात कियाराने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. आणि त्यावर तिने ग्रीन पेस्टल रंगाचे ओव्हरसाईझ ब्लेझर घातले आहे.
 
हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र त्यानंतरच ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. ‘तू पँट घालायची विसरली आहेस का’, असा प्रश्न काही जणांनी तिला विचारला आहे. तर काहीजण म्हणाले की, ब्लेझरसोबत पँटही मिळते. ती तू घ्यायला हवी होतीस’.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती