सलमान खानमुळे कपिल शर्मा दिलासा मिळाला आहे. घसरत्या टीआरपीमुळे सोनी चॅनलने कपिल शर्माला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. कपिलचा शो बंद करुन त्या जागी सलमान खानच्या 'दस का दम' या शोचं नवं सत्र सुरूआहे. पण सलमान खानकडे सध्या वेळ नसल्यामुळे कपिल शर्माला याचा फायदा झाला आहे. सलमान खान सध्य़ा टायगर जिंदा है या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार दस का दम हा शो जानेवारी 2018 मध्ये येणार आहे. सलमानकडे सध्या वेळ नाही. त्याचा आगामी चित्रपट ईदला रिलीज होत आहे. तो त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तसेच टायगर जिंदा है याचे शुटींगही सुरु आहे.