सैफ अली खानला 5 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मंगळवार, 21 जानेवारी 2025 (15:58 IST)
बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले .अभिनेत्याला या घटनेच्या पांच दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाा आहे. आज मंगळवारी अभिनेता त्याच्या घरी परतले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. 

16 जानेवारीला हल्लेखोराने त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले, तेथे त्यांच्यावर अनेक तास शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानला17 जानेवारीला आयसीयूमध्ये हलवण्यात आले. यानंतर त्यांना सामान्य खोलीत हलवण्यात आले. या हल्ल्यात सैफला तीन ठिकाणी दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हाताला दोन, मानेच्या उजव्या बाजूला एक जखम. याशिवाय पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. सध्या अभिनेता धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

चाकू हल्ल्याच्या घटनेचा प्रत्येक कोनातून पोलीस तपास करत आहेत. रविवारी पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद याला ठाण्यातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशचा नागरिक असून तो बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाला होता. 30 वर्षीय शहजाद चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या घरात शिरला.आणि अभिनेत्यावर हल्ला केला.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती