राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मंगळवार, 27 जुलै 2021 (16:06 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधन यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय.या याचिकेवर उद्या सुनावणी पार पडणार आहे.
 
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती