दक्षिण भारतीय अभिनेते रोबो शंकर यांचे निधन

शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 (15:45 IST)
दक्षिण भारतीय अभिनेता रोबो शंकर यांचे गुरुवारी निधन झाले. अभिनेता रोबो शंकर यांना आरोग्याच्या समस्येमुळे अलिकडेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अभिनेता कमल हासन यांनी शोक व्यक्त केले आहे. 
ALSO READ: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणारे दोन गुन्हेगार चकमकीत ठार
ते रोबो शंकर यांच्या विनोदाचे चाहते होते. कमल हासन यांनी रोबो शंकर यांच्या निधनावर ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. दोघांमध्ये जवळचे नाते होते. रोबो शंकर यांनी तमिळ चित्रपटांमध्ये उत्कृष्ट विनोदी भूमिका साकारल्या होत्या आणि प्रेक्षकांना खूप हसवले होते. ते 'थेरी' आणि 'विश्वासम' या चित्रपटांमध्ये दिसले होते. 
ALSO READ: आलोक नाथ यांच्या अटकेवर बंदी, मल्टी लेव्हल मार्केटिंग फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
46 वर्षीय रोबो शंकर यांना काही वर्षांपूर्वी कावीळ झाली होती, ज्यातून ते हळूहळू बरे होत होते. गेल्या आठवड्यात, अभिनेत्याची प्रकृती अचानक घरी बिघडली. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ALSO READ: अभिनेत्री करिश्मा शर्मा मुंबईत लोकल ट्रेनमधून उडी मारल्याने गंभीर जखमी
गुरुवारी, रोबो शंकर यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. वृत्तानुसार, रुग्णालयाने त्यांना यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याचे म्हटले आहेआज शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे . 
Edited By - Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती