अभिनेता KRK वर बलात्काराचा आरोप

मंगळवार, 27 जुलै 2021 (15:45 IST)
अभिनेता समीक्षक केआरके आता मोठ्या संकटात सापडला आहे.त्याच्यावर एका तरुणीने चक्क बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. 
 
कमाल खान म्हणजेच केआरखान नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो.परंतु यंदातो मोठ्या आरोपाखाली अडकल्याचे वृत्त मिळाले आहे.
 
वृत्तानुसार आरोप करणारी तरुणी एक फिटनेस मॉडेल आहे.या तरुणीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात केआरके विरुद्ध तक्रार नोंदवली आहे.सध्या केआरके दुबईत आहे.या तरुणीने केआरकेच्या विरोधात नोंदवलेली FIR ची कॉपी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.त्यामुळे केआर के मोठ्या अडचणीत सापडला आहे.अद्याप केआरकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.पोलीस तपास करीत असल्याचे समजले आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती