डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील मोर्चाला प्रियांकाचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिका, युरोप आणि इतर काही शहरातील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. या मोर्चाला बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही पाठिंबा दर्शवला आहे. मोर्चातील महिलांचा अभिमान असून या मोर्चात आपल्याला सहभागी न होता आल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे.
 
डोनाल्ड यांच्या कारकिर्दीत महिलांचे हक्क, अधिकारावर यांच्यावर गदा येईल, अशी सर्वसाधारण भूमिका अमेरिकेत व्यक्त होत आहे. त्‍यांच्या विरोधात लाखोंच्या संख्येने अमेरिकन महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. वॉशिंग्टनमध्ये सर्वात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. मॅडोना, मायकेल मूर, ग्लोरिया स्टिनेम, कीज यांनी यावेळी ट्रम्प यांच्यावर टीका केली. बोस्टन शहरातील मोर्चात जवळपास सव्वा लाख महिला सहभागी झाल्या होत्या. तर लॉस एजेलिंसमधील मोर्चात १ लाख लोक सहभागी झाले होते. 

वेबदुनिया वर वाचा