आमिर खानच्या या कामामुळे खूश झाले पंतप्रधान, सोशल मीडियावर केली प्रशंसा

मंगळवार, 2 जुलै 2019 (12:07 IST)
बॉलीवूड अॅक्टर आमिर खान (Aamir Khan) समाजाशी निगडित मुद्द्यांवर नेहमी आपले मत मांडत असतो. सध्या संपूर्ण देशात पाण्याची किल्लत सुरू आहे. पाण्याच्या वाढत्या किल्लतीमुळे मोदी सरकारने 'जल शक्ती अभियान' (Jal Shakti Abhiyan)ची सुरुवात केली. या अभियानात फक्त सामान्य लोकच नव्हेतर खास लोकांची देखील प्रशंसा करण्यात आली आहे. नुकतेच पीएम मोदी (PM Modi)यांच्या या अभियानाची आमिर खानने तारीफ करत एक पोस्ट केली. ही पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
 
आमिर खानने ट्विट केले - 'पाण्याला मौलिक आणि प्राथमिक मुद्दा बनवण्यासाठी आपल्या द्वारे उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आमचे पूर्ण समर्थन तुम्हाला आहे. आमिर खानच्या या पोस्ट नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा करत कमेंट केले.' पीएम मोदी यांनी लिहिले - 'पाण्याला वाचवणे आणि लोकांना यासाठी जागरूक करणे आमिर खानचे हे प्रयास एकदम योग्य आहे.' 
पीएम मोदी यांनी 30 जून रोजी 'मन की बात' कार्यक्रमात देशात वाढत्या जल संकटाचा मुद्दा उचलला होता. त्यांनी म्हटले की आम्ही पावसाचे फक्त 8 टक्के पाणीच जमा करू शकतो. जर जल संग्रहाची क्षमता वाढवण्यात आली तर यामुळे जल संकटापासून आपण बाहेर येऊ शकतो. पीएम मोदी यांच्या या 'जल शक्ती संरक्षण'ची प्रशंसा करण्यात येत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती