पायल रोहतगीला अटक, नेहरू यांच्याविरोधात केले होते विधान

सोमवार, 16 डिसेंबर 2019 (11:32 IST)
अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली. पायलला माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अटक केली होती.
 
पायलने तिला अटक झाल्याचं ट्विटरवरून सांगितलं त्यानंतर तिला बॉलिवूड सेलिब्रिटींनी पाठिंबा देखील दिला कारण लोकशाहीत एखाद्याला अशाप्रकारे अटक करणं योग्य नाही असे अनेकांचे मत होते.
 
अभिनेत्री पायलने देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तिने एक व्हिडिओ शेअर करत दावा केला की, 'मला वाटतं की मोतीलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते.' पायलने आपल्या या दाव्यात एलिना रामाकृष्णाने लिहिलेल्या आत्मचरित्राचा उल्लेख केला होता.
 
तिच्या या आक्षेपार्ह विधानामुळे तिला अटक करण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती